Marathi Poem:माझा बापू!



|| Hari Om ||

This is my first attempt at writing a poem in Marathi. I owe this entirely to my Dearest Bapu(Dr. Aniruddha D. Joshi), who asked me to start learning Marathi, a subject I never had at school ! Truly, all that I have learned is from reading what Bapu has written: His Granthas and His Agralekhs( Editorials) in the Pratyaksha.

Ambadnya Dearest Dad. This is from You, for You! I hope You like it.  


माझा बापू!




आम्ही सगळे पापी होतो,
अजुन आहोत तसेच आम्ही!
पण बापूला फरक पडत नही,
तो तर प्रेम करतो तरी.



त्यच्या पापी बाळांना,
त्याने दिली आहे ग्वाही,
"माझ्या लडक्या बालका,
मी तुला कधीच टाकणार नाही!" 



किती चुका आम्ही करतो,
परत-परत चुकत राहतो,
तरी संकटच्या वेळी,
तो लगेच धावत येतो.



त्याच्या मार्गावरून चालण्याचे,
प्रयास जो मनापासून करेल,
तो कधीच एकटा नाही,
त्याचा हात माझा बापू धरेल!



करूणा, प्रेम, दया,क्षमा,
सर्वोच्च आहेत त्याचात,
म्हणूण माझ्या सारख्यांनाही
तो उचलून घेई हातात!




जे देवाला जाणत नाहीत,
ज्यांना पूजा-विधी कळेना,
अशा मंडळींना गोळा करून,
बनवली त्याने वानर सेना.



रावणाच्या वधाची,
वाट त्याने मोकळी केली,
वृत्राच्या कैदेतून सर्वांची,
माझ्या बापूने सुटका केली.



आपल्याला अंबज्ञतेचा,
पाठ त्याने शिकवीला,
आणी अखण्ड सामिप्याचा,
सुवर्ण मार्ग उघडला.



आई, बापू, दादा ऐका,
ऐका ह्या बाळाची हाक,
मर्यादेचे भान असूदे,
राहो सतत तुमचा धाक.


विसरलो हे विश्व सारे,
विसरलो जीवन मरण,
आता तुझा सखा बनव,
दे रे बापू तुझे चरण!


|| Shri Ram ||
|| Ambadnya ||
|| I Love You my Dad ||
|| जय जगदम्ब जय दुर्गे ||


-Arnav H. Tongaonkar 
16.09.2013

No comments: